कोलकाता
आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी सिस्को यांनी अलीकडे 4000 जणांना कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. एकूण कर्मचाऱयांपैकी पाच टक्के इतकी कर्मचारी कपात आगामी काळात कंपनीकडून केली जाणार आहे. कंपनीमध्ये अंदाजे 83 हजार 300 एकंदर कर्मचारी कार्यरत आहेत. या अनुषंगाने येत्या काळात 4,300 जणांना कामावरून कमी करणार हे नक्की आहे.