प्रतिनिधी/ बेळगाव
स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने नैर्त्रुत्य रेल्वेने ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ ही योजना आखली आहे. या योजनेंतर्गत बेळगाव रेल्वेस्थानकावर खादी उत्पादनांचा स्टॉल उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी स्टेशन मॅनेजर व इतर अधिकाऱयांच्या उपस्थितीत झाला.
बेळगावसह महत्त्वाच्या सर्व रेल्वेस्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’अंतर्गत स्थानिक साहित्य विक्रीसाठी ठेवले जाणार आहे. ज्या भागात ज्या साहित्याचे उत्पादन होते, त्याच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बेळगाव रेल्वेस्थानकासाठी शहापूर साडी, कुंदा, कर्दंट व खादी साहित्य मंजूर करण्यात आले होते.
या योजनेंतर्गत रेल्वेस्थानकात बेळगाव जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्यावतीने खादी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. सुती कपडे व इतर साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. रेल्वेस्थानकावरील हा पहिलाच स्टॉल आहे. पुढील काळात इतर साहित्यासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.