बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स, कंग्राळ गल्ली आयोजित श्री गणेश सिंगल विकेट 44 व्या चषक स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 64 खेळाडूंचा सहभाग होता. सरदार मैदानावर श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केजीबी स्पोर्ट्सचे माजी खेळाडू व संघाचे मार्गदर्शक दीपक पवार, कंग्राळ गल्लीतील पंचमंडळ मालोजीराव अष्टेकर, शरद पाटील, पकंज पाटील, गंगाधर पाटील, बाबुराव कुट्रे, शंकर बडवाण्णाचे, गोपाळ सांबरेकर, सुरेश गडकरी, अजित कुलकर्णी, अरुण पठाणे, अशोक कंग्राळकर, विनायक निलकंठाचे, सुहास पाटील, गजानन बडवाण्णाचे, अनिल पाटील, सुनिल पाटील, बाबू इंगोले, पवन बडवाण्णाचे, राजू सदरे, ललित कोकीतकर, मनोज ताशीलदार, सुनिल नायडू, राजू केलीगेरी, परशराम तोरे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीचे पूजन व यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित खेळाडूंना एसपी कार अॅसेसरीजच्यावतीने टी शर्टचे वितरण करण्यात आले. यावेळी चषकाचा इतिहास व महत्त्व सांगण्यात आले. तसेच सरपंच पी. डी. पाटील, ए. डी. जाधव, केजीबी स्पोर्ट्चे आधारस्तंभ राजू कागीनकर, भारती सांबरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शरद पाटील यांनी सामन्याचे नियम व अटी समजावून बक्षीसांचे स्वरुप सांगितले. उपस्थित पत्रकार, पाहुणे व छायाचित्रकारांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 64 क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. यावेळी केजीबी स्पोर्ट्सचे पदाधिकारी व बेळगावचे क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.