पूर्वीचे आरक्षण लागू करण्याची मागणी
बेळगाव : मुस्लिमांना देण्यात आलेले आरक्षण राज्य सरकारने मागे घेतले आहे. त्यामुळे मुस्लिमांवर अन्याय झाला असून त्याचा निषेध नोंदवत असल्याचे टिपू सुलतान संघर्ष समितीच्यावतीने सांगण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देण्यात आले असून, तातडीने आम्हाला पूर्वी असलेले आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. मुस्लिमांचे आरक्षण काढून त्यांना हे आरक्षण दिले गेले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. एकप्रकारे लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कमकुवत करण्याचा प्रयत्न
कोणालाही आरक्षण दिले म्हणून आमचा त्याला विरोध नाही. मात्र आम्ही आर्थिक मागासलेले असताना आरक्षण रद्द करून मुस्लिमांना कमकुवत करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. य् ाावेळी महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना टिपू सुलतान संघर्ष समितीचे वासीम बेपारी यांच्यासह मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.