भीम सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाद्वारे निवेदन
बेळगाव : धारवाड येथील एका दलित पत्रकाराला हेतुत: गुन्ह्यामध्ये अडकविण्यात आले आहे. बी. टी. व्ही. च्या पत्रकारावरील गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी तसेच या घटनेच्या निषेधार्थ येथील कर्नाटक भीम सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. मेहबूब मुन्नवळ्ळी या पत्रकारावर हा गुन्हा दाखला केला आहे. यामुळे त्याच्यावर अन्याय झाला असून तातडीने तो गुन्हा मागे घ्यावा आणि पत्रकारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. यावेळी प्रवीण मादार, शंकर रामलिंगय्या, लक्ष्मण के. आर., नहीम मुजावर, अजय शिंगे, निखिल कोलकार, दीपक कांबळे, रामचंद्र कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.