प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात लागलेल्या बाजार समितीच्या निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे प्रभुत्व ठेवण्यासाठी आणि भाजपा व शिंदे गटाला नमवण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनात सोमवारी दुपारी बैठक पार पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दुपारी झालेल्या बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकायांकडून रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिह्यातील बाजार समितीच्या अनुषंगाने आढावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता कशी काबीज करता येईल यासाठी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बाजार समितीच्या मतदार संघात ध्येयधोरणे व प्रचाराच्या अनुषंगाने बैठका घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याने जिह्यात जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बाजार समित्या आल्या पाहिजेत, यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकायांनी कंबर कसून कामाला लागावे, कोणतेही सबब यावेळी सांगता कामा नये भाजप आणि शिंदे गटाला नाक वर काढता कामा नये अशी रणनीती यावेळी आखण्यात आली.