न्हावेली / वार्ताहर
डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ,दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय,मूळदे,ता.कुडाळ,जि. सिंधुदुर्ग येथील कार्यानुभव कार्यक्रम 2023 अंतर्गत निरवडे गावामध्ये कृषीदूत म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय निरवडे येथे कृषी माहिती केंद्र सुरू केले आहे. याचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन कार्यक्रमासनिरवडे गावच्या सरपंच सौ.सुहानी गावडे,उपसरपंच श्री.अर्जुन पेडणेकर, विद्यमान सदस्य श्री.धर्माजी गावडे,माजी सरपंच श्री.प्रमोद गावडे,माजी सरपंच श्री. सदा गावडे,कृषी सहायक सौ. प्रिया सावंत,कृषी पर्यवेक्षक सौ.सुषमा देसाई,उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.संदीप गुरव व डॉ.रणजीत देव्हारे, प्रगतशील शेतकरी श्री.संतोष गावडे,श्री.बाबा मल्हार,श्री. दाजी गावडे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ.संदिप गुरव सर यांनी श्रीफळ वाढवून आणि सरपंच सौ.सुहानी गावडे यांनी फित कापून माहिती सेवा केंद्राचे उद्घाटन केले. डॉ.संदीप गुरव यांनी ग्रामीण उद्यानविद्या प्रशिक्षण कार्यक्रम व कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचा उद्देश विषद केला. डॉ.रणजीत देव्हारे यांनी फळे आणि भाजीपाला या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रगतशील शेतकरी श्री.प्रमोद गावडे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ.सुहानी गावडे यांनी देखील या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्ये विषयक मार्गदर्शन कृषी सहाय्यक सौ.प्रिया सावंत आणि कृषी पर्यवेक्षक सौ. सुषमा देसाई यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कु.राजस कदम याने केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु. राजस कदम, सुयश काळे,सुदर्शन पाथलावत,अमन नवल,रामचंद्र वारंग, ओमकार उंबरकर यांनी विशेष मेहनत घेतली.