क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युवजन क्रीडा खाते व महिला सबलीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय दसरा ऍथलेटीक्स स्पर्धेत भरतेश पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडापटूंनी घवघवीत यश संपादन केले.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित या क्रीडा स्पर्धेत भरतेश महाविद्यालयाचा खेळाडू चैतन्य मुदलीयारने 200, 400 मी. धावणे, 4ƒ400 मीटर रिले या प्रकारात सुवर्ण तर, 4ƒ100 मीटर रिलेमध्ये रौप्य पटकाविले. जाफर खानने लांब उडी, तिहेरी उडीमध्ये सुवर्ण तर 200 मीटर धावणे, 4ƒ100 मीटर रिलेमध्ये रौप्य, संजना गोमाण्णाचेने उंच उडीत पाचवा क्रमांक, तुषार भेकणेने 800, 1500 मी. धावणे, 4ƒ400 मी. रिले यात सुवर्ण, भूषण पुजारीने 800 मी. धावण्यात रौप्य, 4ƒ400 मी. रिलेमध्ये सुवर्ण, श्रीकांत कांबळेने 4ƒ400 मी.मध्ये सुवर्ण, 4ƒ100 मी.मध्ये रौप्य, भुवन पुजारीने 4ƒ400 व 4ƒ100 यामध्ये दोन रौप्यपदक, आकाश देवर व रोहित पाटील यांनी 4ƒ400 मध्ये रौप्य पदक पटकाविले. या सर्व खेळाडूंना भरतेश महाविद्यालयाचे क्रीडा प्राचार्य प्रदीप जुवेकर यांचे मार्गदर्शन तर प्राचार्या सुनीता देशपांडे, उपप्राचार्या महादेवी गोजे पाटील व नीता गंगरेड्डी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.