दहा दिवसात 2 लाखांहून अधिकांची भेट : अन्नोत्सवचा प्रवास व्हिडीओच्या माध्यमातून
प्रतिनिधी /बेळगाव
अंगडी कॉलेजच्या मैदानावर आयोजित रोटरी अन्नोत्सवाची सांगता रविवारी झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात रोटरी क्लब बेलगामचे अध्यक्ष बसवराज विभुती यांनी स्वागत केले. अन्नोत्सवचे तीन चेअरमन पराग भंडारे, योगेश कुलकर्णी व मनोज पै यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विविध समिती प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या दहा दिवसात 2 लाखांहून अधिक लोकांनी अन्नोत्सवाला भेट दिली, अशी माहिती यावेळी देण्यात आली. अरिहंत हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रावसाहेब पाटील, कार्यकारी संचालक डॉ. महादेव दीक्षित यावेळी उपस्थित होते. अन्नोत्सवला डॉ. प्रभाकर कोरे, आमदार अनिल बेनके, सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन प्रशंसा केली. अन्नोत्सवच्या 25 वर्षांचा प्रवास व्हिडीओच्या माध्यमातून दाखविण्यात आला.
रोटरॅक्ट सदस्यांचा सत्कार
अन्नोत्सवला सहकार्य करणारे रणजित मन्नोळकर, विजय बांदेकर, एक्स्ट्रीम सिक्युरिटी सर्व्हिस यांचा तसेच सरिता सबनीस, प्रिती भंडारे, शिल्पा मनोज व योगिनी नाईक शिवाय रोटरॅक्टचे सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे मुकुंद बंग, नितीन गुर्जर, सचिन बिच्चू, जयदीप सिद्दण्णावर, तुषार कुलकर्णी, नितीन शिरगुरकर, अक्षय कुलकर्णी, शरद पै, विशाल पट्टणशेट्टी, संदीप नाईक, अल्पेश जैन, नंदन भंडारी, संतोष पाटील, मनोज मिशेल, सुनिष मेत्राणी, सचिन सबनीस यांचा सत्कार करण्यात आला. प्रायोजक अरिहंत हॉस्पिटल, केम्को, इंड्स अल्टम स्कूलचे पदाधिकारी उपस्थित होते.
समारंभात विशेष…
बेस्ट कंझ्युमर स्टॉल – मेराकी जुवेलरी हाऊस- स्टॉल नं. 29, बेस्ट कंझ्युमर डेकोरेटेड स्टॉल-न्यू फाईन टच टेलर- स्टॉल नं. 48, बेस्ट डेकोरेटेड स्टॉल फूड-गार्डन कोर्ट – स्टॉल नं. 1, बेस्ट नॉनव्हेज अमॅच्युअर-कबाब स्टोरी-स्टॉल नं. 58, बेस्ट नॉनव्हेज प्रोफेशनल-शफिकभाई लाहोरी-स्टॉल नं. 8, बेस्ट व्हेज प्रोफेशनल-अम्रितसरी कुलचा- स्टॉल नं. 15, बेस्ट व्हेज अमॅच्युअर-केएलई ग्रॅज्युएट स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-स्टॉल नं. 12.