मुंबई प्रतिनिधी
माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुंबईत राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दर वर्षी आयोजित करण्यात येणार्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा निर्माण करण्याची मागणीही केली.
या भेटी प्रसंगी उदयनराजे यांनी मुनगंटीवार यांना तलवार भेट दिली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उदयनराजेंना वाघाची प्रतिकृती व भारतीय तिरंगा भेट म्हणुन दिली. या प्रसंगी रंगकर्मी व सातारा नगर पालिकेचे माजी नगरसेवक श्री कल्याण राक्षे, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ चे प्रदेश सह संघटक श्री पंकज चव्हाण, सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री श्रमिक गोजमगुंडे, श्री काका धुमाळ, अॅड श्री विनीत विलास पाटील उपस्थित होते.