कुर्डुवाडी/प्रतिनिधी
सर्व साखर कारखान्यांचे काटे ऑनलाइन करावे, उसाला पहिली उचल २५०० रुपये तर अंतिम दर ३१०० रुपये मिळावा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी उस दर संघर्ष समितीच्यावतीने आज सायंकाळी ५ वाजता सीना नदीच्या पात्रात उतरून जल आंदोलन केले.
यावेळी, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दीपक भोसले, बळीराम गायकवाड, सुहास गायकवाड, अण्णा जाधव, बापू गायकवाड, दत्ता पंडित, अनंत करळे, विकास गायकवाड, समाधान फाटेयांच्यासह संघर्ष समितीच्या इतर सदस्यांनी नदीपात्रात आंदोलन केले.
यावेळी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहा. पो. नि. विक्रांत बोधे, माढ्याचे सहा. पो. नि. बुवा, पो. पनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पो. ह. घाडगे. बी. एस, पो. काॅ. दत्ता सोमवाड व इतर पो.कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेत नदीपात्रातील आंदोलनकर्त्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलनकर्ते उसालादर मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत नदीपात्रातून बाहेर आले.