कलगोंडा टेळे यांनी कृषी विभागाच्या राज्यस्तरीय पिक स्पधेत उमटविला ठसा
नंदकुमार साळुंखे/टोप
सलग चार वर्षे सरासरी दर हेक्टरी भात पिकाचे उत्पादन 115 क्विंटल घेत शासनाच्या कृषी विभागाच्या भात पीक स्पधेत ठसा उमटविला आहे. यामुळे राज्यात भात पिकाचा सुळकुड पॅटर्न यशस्वी केला आहे. कागल तालुक्यातील दुधगंगेच्या काठावर वसलेल्या सुळकुडच्या कलगोंडा मलगोंडा टेळे यांनी हा प्रयोग केला आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सन 2011 मध्ये सुळकुडची शेतीशाळेसाठी निवड केली. या शाळेत सहभागी होऊन टेळे यांनी माती परीक्षण, शेतीची मशागत, बियाणे निवड, बिजप्रक्रीया, खताची मात्रा कशा प्रकारे द्यायची यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन शेतीतज्ञांकडुन घेतले. त्यानुसार शेतीत उत्पादन घेण्यास प्रारंभ केला. प्रारंभी खरीपात भात पीक घेतले. त्यात अधिक उत्पादन मिळाले. मलगोंडा टेळे यांनी भात शेती करण्याचा निर्णय घेतला.
फेब्रुवारीमध्ये त्यांनी आपल्या वेगवेळ्या क्षेत्रात खोडवा ऊसतोड झाल्यानंतर पाचट न जाळता यंत्राद्वारे कुट्टी केली. हेक्टरी 20 ट्रॉली शेणखत टाकुन नागंरट केली. दोन ते तीन महिने जमीन फेरपालटासाठी ठेवली. मे मध्ये रोटोवेटने मशागत सारटी सोडण्यात आली व रोहीणी नक्षत्रावर टोकण पेरा 9 इंच बाय 9 केला. यासाठी कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या सुधारीत व सकंरीत वाणाच्या बियांणाचा वापर केला. नियमित भात पिकास पाटपाण्याने पाणी देण्याचे नियोजन केले. त्याच बरोबर सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर केला. पीक कापणी 150 दिवसात यावे असे त्यांनी नियोजन केले.
सन 2015-16 मध्ये हेक्टरी 110 क्विंटल. सन 2017-18 हेक्टरी 92.82 क्विंटल.सन 2019-20 हेक्टरी 107.63 क्विंटल, 2020-21 हेक्टरी 115.56 क्विंटल उत्पादन घेतले आहे. सन2017-18, 2018-19 ला राज्यस्तरीय पीक स्पर्धेत तृतिय तर सन 2020-21 राज्यात सर्वात जास्त हेक्टरी 115 क्विंटल उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या शेतीसाठी योग्य वेळी जमिनीची मशागत, माती परीक्षण, योग्य वेळी पेरणी, व पेरणीचे योग्य अंतर मशागत खत व्यवस्थापन रोग व किड नियंत्रण काढणी नियोजन करुन भात पिकाचे हेक्टरी विक्रमी उत्पादन कलगोंडा टेळे यांनी घेतले. तरुण शेतकरी वर्गाने आपल्या शेतात उपलब्ध साधनातून तंत्रशुद्ध पद्धतीने शेतीतज्ञांचे मार्गदर्शन घेऊन उत्पन्नात वाढ करावी असे अवाहन टेळे यांनी केले. शेतीसाठी कृषि विभागाचे आधिकारी, सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र कणेरीचे शात्रज्ञ, बसवेश्वर शेतकरी गट व वडील मलगोंडा टेळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कागल तालुक्यातील सुळकुड येथील कलगोंडा टेळे हे दहावी पास आहे. भात पिकातील सुळकुड पॅटर्नविषयी ते जिह्यातील रामेती, शेतीशाळा, तालुकास्तरावर तंत्रशुद्ध पद्धतीने माहिती देत असतात.