आमदार प्रदीप ईश्वर : केएलई विद्यापीठाच्या आवारामध्ये प्रचार
बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय जीवनाला प्रारंभ करणाऱ्या मृणाल हेब्बाळकर यांचे भविष्य उज्वल आहे. भविष्यातील नेता असून अशा तरुणाला मतदारांनी साथ देवून भरघोस मताने निवडून द्यावे, असे आवाहन चिक्कबळ्ळापूरचे आमदार प्रदीप ईश्वर यांनी केले. महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व आमदार प्रदीप ईश्वर यांनी केएलई आयुर्वेदिक, केएलई विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करून ते बोलत होते. मृणाल हेब्बाळकर हे तरुण राजकारणी असून त्यांना अद्याप 40 ते 50 वर्षे राजकारण करण्याची संधी आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सर्वांना वेळ देण्यासाठी ते उपलब्ध असतील. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून त्यांना चांगले मार्गदर्शन मिळत असून विकासाभिमुख योजना राबविण्यात ते यशस्वी ठरतील. गृहलक्ष्मी योजना अनुष्ठान करण्यामध्ये लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पात्र महत्वाचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत मृणाल यांना मतदारांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. देशामध्ये विकास कामे राबविण्यात काँग्रेस पक्षाचे पात्र महत्त्वाचे आहे. अन्न सुरक्षा कायदा काँग्रेस पक्षाकडूनच आणण्यात आले आहे. सरकारी कंपन्या, रेल्वे, आयआयटी या सारखी अनेक महाविद्यालये, विद्यापीठे उभाण्यामध्ये काँग्रेस पक्षाचे योगदान अधिक आहे, असे आमदार प्रदीप ईश्वर यांनी सांगितले. बेळगाव दुसरी राजधानी म्हणून केवळ सांगण्यासाठीच राहू नये. या भागाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे. यासाठी तरुण उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बेंगळूर उत्तरचे काँग्रेस उमेदवार प्रा. राजीव गौड, उमेदवार मृणाल हेब्बळकर, केएलई संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.