डिचोली पोलिसांच्या तपासाला यश : मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी /डिचोली
दत्तवाडी सांखळी येथील एका दुकानाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील लॅपटॉप व संगणकाचे इतर सामान चोरणाऱया चोरटय़ास डिचोली पोलिसांनी पकडून रितसर गुन्हा दाखल करून अटक केली.
सदर घटना 27 जुलै रोजी सकाळी 9 ते 12 या दरम्यान घडली होती. डिचोली पोलिसांनी लगेच उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना, डिचोली पोलीस उपअधीक्षक सागर एकोसकर व निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा छडा लावत संशयितास ताब्यात घेतले.
ही चोरीची घटना 27 जुलै रोजी घडला होता. एका अज्ञात इसमाने दत्तवाडी साखळी येथील आजगावकर इमारतीत असलेल्या ‘अनधा एंटरप्राइजेस’ या दुकानाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील एक डेल कंपनीचा लॅपटॉप, माऊस, किबोर्ड, मॉनिटर व रेनकोट असे मिळून सुमारे 32 हजारांचा माल लंपास केल्याची तक्रार या दुकानाचे मालक संदीप गजानन मांदेकर (धनगरवाडा, घोटेली सत्तरी) यांनी डिचोली पोलीस स्थानकात 29 जुलै रोजी नोंदवली होती.
या तक्रारीवरून डिचोली पोलिसांनी तपासाची चपे गतिमान करताना कसून शोध घेतला व न्यू कॉलनी, मोर्ले, पणसुले सत्तरी येथील इंद्रजीत राणे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून सर्व चोरीचा माल जप्त करण्यात आला. या चोरीच्या तपासात डिचोली पोलीस निरीक्षक सुरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मधू गावस, अनिल पोलेकर, पोलीस कॉन्स्टेबल गौरव वायंगणकर, रणधीर बाले यांनी यशस्वी कामगिरी बजावली.