क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यप्रदेश भोपाळ येथे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी सेंटपॉल स्कूलचा विद्यार्थी स्वरूप धनुचेची निवड झाली आहे. या स्पर्धेत स्वरूप हा 100 मी. बटरफ्लाय, 200 मी. बटरफ्लाय, 400 मी. जलतरण स्पर्धेत भाग घेणार आहे. स्वरूपला मुख्याध्यापक डॉ. सविवो अॅब्रु, उपमुख्याध्यापक सबस्टेन परेरा, क्रीडा शिक्षक अँथोनी डिसोझा, एनआयएस प्रशिक्षक विश्वास पवार, नटराज यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे. स्वरूप हा बसवनगुडी अॅक्वाटिक सेंटर बेंगळूर येथे सराव करत आहे.