वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
2022 च्या टेनिस हंगामाअखेर पोलंडची महिला टेनिसपटू इगा स्वायटेकने महिला एकेरीच्या मानांकनातील आपले अग्रस्थान कायम राखले आहे. स्वायटेकने आतापर्यंत तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
21 वर्षीय स्वायटेकने महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 11085 मानांकन गुणासह पहिले स्थान मिळवले आहे. चालू वर्षाच्या टेनिस हंगामात स्वायटेकने विविध स्पर्धांमध्ये एकेरीतील 8 अजिंक्यपदे मिळविली आहेत. या मानांकन यादीत टय़ूनेशियाची ओनेस जेबॉर दुसऱया स्थानावर आहे. जेसिका पेगुलाने तिसरे स्थान घेतले असून फ्रान्सची कॅरोलिना गार्सिया चौथ्या स्थानावर आहे. बेलारुसच्या साबालिनेकाने पाचवे स्थान मिळवले असून ग्रिकच्या मारिया सॅकेरिने सहावे स्थान मिळवले आहे.