वृत्तसंस्था/ बर्लिन
भारताची माजी ज्युनियर अग्रमानांकित तसनिम मिरने जर्मनी ओपन बॅडमिंटन सुपर 300 स्पर्धेत महिला एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळविला.
तसनिमने आयर्लंडच्या रॅशेल दारागवर पात्रता लढतीत 24-22, 21-8 अशी मात केली. 17 वर्षीय तसनिमची पहिल्या फेरीची लढत जागतिक 11 व्या मानांकित पॉर्नपोवी चोचुवाँगविरुद्ध होणार आहे. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा व बी.सुमीत रेड्डी यांना पात्रता फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. स्कॉटलंडच्या ऍडम हॉल व ज्युली मॅकफर्सन या 25 व्या मानांकित जोडीकडून त्यांना 10-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीत एस. शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यमने स्लोव्हाकियाच्या मिलन द्रात्वाचा 21-11, 23-21 असा पराभव केला. पण नंतर अझरबैजानच्या रेस्की द्विकाहयोकडून त्याला 23, 19-21 असा पराभव स्वीकारावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. तसनिम मिरसह मालविका बनसोडनेही मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे.