अमेरिकेत टाटाचे 45,000पेक्षा अधिक कर्मचारी, तीन वर्षात दिल्या 21,000 नोकऱ्या
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
दिग्गज भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) चा फोर्ब्सने अमेरिकेतील ‘बेस्ट लार्ज एम्प्लॉयर्स’च्या वार्षिक यादीमध्ये समावेश केला आहे. ही यादी 1000 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या अमेरिकेतील कंपन्यांसाठी प्रसिद्ध होत असते. टीसीएसचे अमेरिकेत 45,000 कर्मचारी काम करतात.
टीसीएस ही आयटी इंडस्ट्रीत अमेरिकेमध्ये सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांमध्ये एक आहे.
गेल्या तीन वर्षात टीसीएसने 21,000 पेक्षा जास्त लोकांना नोकरी दिली आहे. टीसीएसने अमेरिकेत कंपनीत काम करण्यासाठी खूप पोषक वातावरण तयार केले असून या मैत्रीयुक्त वातावरणात अनेकांना वैयक्तिक स्तरावर वाढीसोबत कंपनीच्या भरभराटीत हातभार लावण्याचे कार्य साध्य करता येत आहे. हवेहवेसे वातावरणच कंपनीला अमेरिकेत व इतरत्र वाढण्यासाठी पोषक ठरते आहे, असे
टीसीएसचे उत्तर अमेरिका विभागाचे अध्यक्ष सुरेश मुथुस्वामी यांनी सांगितले. फॉर्च्यूननेही टीसीएसला लिस्टमध्ये जागा दिली. करियरब्लिस ने 2023 च्या 50 सर्वोत्तम हॅप्पीएस्ट कंपनीत कंपनीला समाविष्ट केले आहे. टीसीएस बाजारमूल्याच्या हिशोबाप्रमाणे भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.