सेवा साफल्यानिमित्त शाळेत निरोप समारंभ
सावंतवाडी : प्रतिनिधी
इन्सुली येथील विद्या विकास मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली शाळेचे सहाय्यक शिक्षक गुरुनाथ पेडणेकर यांच्या सेवा साफल्यानिमित्त शाळेत निरोप समारंभ कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत होते. .यावेळेस माजी जि प सभापती प्रमोद कामत, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर डॉक्टर योगेश साळे, गौरवी पेडणेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ,मुख्याध्यापिका सुविद्या केरकर, संस्था सचिव विकास केरकर, प्रशांत कामत, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, कुडाळ नगरसेवक संध्या तेरसे, अन्वर खान, डेगवे सरपंच राजन देसाई, डेगवे सोसायटी अध्यक्ष प्रवीण देसाई, मधुकर देसाई, सचिन पालव, माजी प.स. सभापती मानसी धुरी, महेश धुरी आत्माराम गावडे, संस्था उपाध्यक्ष नरेंद्र मुळीक, सविता आश्रमचे संदीप परब, इन्सुली उपसरपंच, विश्वनाथ राऊळ कृष्णा सावंत तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पेडणेकर यांचे हितचिंतक उपस्थित होते. संस्थेच्यावतीने संस्था अध्यक्ष अशोक सावंत यानी सत्कार केला.