प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील मराठी टीचर्स टेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून माधव कुंटे व प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे माजी विद्यार्थी राजशेखर करडीगुद्दी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एम. बी. हुंदरे होते.
तनिष्का हन्नूरकर हिच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक व परिचय प्रा. व्ही. पी. महाजन यांनी करून दिला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसाद कुंभार, पूजा चाफाळकर, पूजा मिराशी, सुजाता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कॉलेजतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
गायन स्पर्धेत प्रथम- तनिषा हन्नूरकर, द्वितीय- ऋतिका जाधव, तृतीय- मंगल कुकडोळकर, उत्तेजनार्थ- स्नेहल तोरगल यांनी बक्षीस मिळविले. रांगोळी स्पर्धेत प्रथम- मंगल कुकडोळकर, द्वितीय- सीमा गवंडी, तृतीय- सानिका पाटील, उत्तेजनार्थ- संगीता निलजकर, चित्रकला स्पर्धा प्रथम- तनिषा हन्नूरकर, द्वितीय- शामल शिंदे, तृतीय- संजना चव्हाण, उत्तेजनार्थ पूजा चाफाळकर यांनी बक्षीस मिळविले.
यावेळी प्रमुख पाहुणे व वक्त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचेसूत्रसंचालन प्रा. एन. एन. गोल्याळकर यांनी केले. प्रा. पी. एम. सुभेदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.