बेळगाव : शिक्षक दिनानिमित्त इनरव्हील क्लबतर्फे 6 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पीडीसी लता कित्तूर, गोविंद फडके, आनंद गाडगीळ व डोणकरी उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी मंगला हिरेमठ, सावित्री मल्लण्णावर, ज्योती चौगुले, किरण गुरव, कविता चौगुले, सिद्धाली पाटील यांचा लता कित्तूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागतगीत झाल्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. लता कित्तूर, डोणकरी यांची भाषणे झाली. यानंतर शिक्षकांसाठी विविध खेळ घेण्यात आले. यामध्ये ज्ञान प्रबोधन स्कूलच्या शिक्षिका सिद्धाली विजेत्या ठरल्या. कार्यक्रमासाठी इव्हेंट चेअरमन अक्षता कलघटगी, सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर यांनी परिश्रम घेतले.