अहमदाबाद
2002 च्या गुजरात दंगलीनंतर पुराव्यांमध्ये फेरफार करत निर्दोष व्यक्तींना त्यात गोवण्याच्या आरोपाप्रकरणी अहमदाबाद येथील सत्र न्यायालयात खटला चालणार आहे. या प्रकरणातील आरोपी तीस्ता सेटलवाड यांचा अर्ज खटल्याच्या सुनावणीसाठी अहमदाबादच्या सत्र न्यायालयाला पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी सेटलवाड यांच्यासह गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर.बी. श्रीकुमार तसेच माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट हे आरोपी आहेत. अहमदाबाद पोसिलांनी तिघांच्या विरोधात मागील वर्षी गुन्हा नोंदविला होता. यानंतर याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. एसआयटीने 21 सप्टेंबर रोजी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. तीस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. तर भट्ट हे एका अन्य गुन्हय़ासाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.