मुंबई
बुधवारी शेअरबाजारात बीएसईवर इंट्रा डे दरम्यान तेगा इंडस्ट्रिजचा समभाग 7 टक्के इतका वाढत 995 रुपयांवर पोहचत नवा विक्रमी स्तर गाठण्यामध्ये यशस्वी झाला आहे. याआधीच्या 13 जून 2023 रोजीच्या 985 या भावाला मागे टाकण्यात तेगाला यश आले आहे. 19 जूनला कंपनीतील प्रवर्तकांनी 4 टक्के इतके म्हणजेच 2.7 दशलक्ष इक्विटी समभाग विकले आहेत. यादरम्यान मेपासून पाहता हा समभाग जवळपास आतापर्यंत 53 टक्के इतका वाढला आहे.