ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चोरीच्या गुह्यात अटक केलेल्या आरोपीने कोठडीत पांघरण्यासाठी दिलेली चादर कापून कोठडीतच गळफास घेतला. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत आज सकाळी ही घटना घडली.
शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. युनिट सहाच्या पथकाने त्याला हडपसर परिसरातील एका चोरीच्या गुह्यात अटक केली होती. त्याला विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये रात्री ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास डय़ुटीवर असणाऱ्यां कर्मचाऱ्याने लॉकअपमध्ये पाहिलं आणि त्यांना शिवाजी गरड हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने पांघरण्यासाठी दिलेली चादर कापून बाथरुममध्ये गळफास घेतला.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या मृतदेहाचे तहसीलदारांच्या हस्ते शवविच्छेदन करण्यात येणार आहे.