गोवा डेअरी संचालक मंडळाची मागणी : लेखा परीक्षण अहवालाच्या आधारे सहकार निबंधकांना निवेदन
फोंडा : गोवा डेअरीवर नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीच्या कार्यकाळात झालेल्या व्यवहारांची चौकशी तसेच लेखा परीक्षण अहवालानुसार मागील काही खरेदी विक्री व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी गोवा डेअरीच्या संचालक मंडळाने केली आहे. त्यासंबंधीचे लेखी निवेदन राज्य सहकार निबंधकांना सादर करण्यात आले असून त्यावर अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्यासह नऊ संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लेखा परीक्षण अहवालानुसार सन 2020-2021 आणि 2021-2022 च्या लेखा परीक्षण अहवालानुसार टिप्पणी केलेल्या खरेदी विक्री व्यावहारासंबंधी ही चौकशी मागितली आहे. ज्यामध्ये भक्ती एक्सट्रेक्शन्स या कंपनीकडून कच्च्या मालाच्या खरेदी व्यवहारात नकली बिले वापऊन अदा केलेली ऊ. 24 लाख 77 हजारांची रक्कम, जळाऊ लाकुड खरेदी व्यवहार, नवीन दुग्ध प्रकल्प सुऊ करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त कऊन त्याला साधारण ऊ. 5 लाख 90 हजारांची फेडलेली रक्कम, जो प्रकल्प पुढे कधीच होऊ शकला नाही, दुधाची भुकटी साठविण्यासाठी भाडे तत्त्वावर घेतलेली जागा व कमी दर्जाचा दूध पावडर यामुळे डेअरीला बसलेला नुकसानीचा फटका, आमसभेच्या इतिवृत्तात खाडाखोड कऊन नंतर केलेल्या दुऊस्त्या, तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी केलेल्या चुकांमुळे फेर लेखा परीक्षणांवर झालेला खर्च व त्याची वसुली, तसेच फडते यांनी खरेदी खात्याचा व व्यवस्थापकीय संचालकपदाचा ताबा एकाचवेळी स्वत:कडे ठेऊन केलेले काही गैरव्यवहार अशा विविध गैरव्यवस्थापनामुळे डेअरीला बसलेला नुकसानीचा फटका, यावर लेखा परीक्षण अहवालात टिप्पणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सरकारनियुक्त त्रिसदस्यी समितीकडे डेअरीचा ताबा असताना झालेल्या व्यवहारांची चौकशी मागण्यात आली आहे. 2020-21 सालात कन्सलटंट नियुक्त करताना आवश्यक नियम व प्रक्रियांना फाटा देण्यात आला. ज्यामुळे सहकार निबंधकांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झालेला आहे. तसेच काही व्यवहारामध्ये सहकार निबंधकांची मान्यता घेण्यात आलेली नाही. सन् 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात प्रशासकीय समितीने धोरणात्मक व आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेताना राज्य सहकार निबंधकांची मान्यता घेतलेली नाही. सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारचे धोरणात्मक व आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेताना सहकार निबंधकांची मान्यता अनिवार्य असते. त्याचा भंग झालेला आहे. गोवा डेअरीसाठी कच्चा माल व रु. 5 लाखावरील किंमतीचे साहित्य खरेदी करताना आवश्यक प्रक्रिया केली गेली नाही. तसेच डेअरीमध्ये काही जागांवर नोकरभरती करताना मार्गदर्शक तत्त्वांना फाटा दिल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्यासह संचालक उल्हास सिनारी, विठोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब, बाबुराव फट्टो देसाई, उदय प्रभू, नितीन प्रभूगावकर, बाबू फाळो यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, गोवा डेअरीचे संचालक माधव सहकारी व अनुप देसाई यांच्या राजीनाम्यावर बुधवार 15 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी दिली.