दिग्दर्शक लव्ह डायज यांचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
फिलिपिनो लेखक लव्ह डायझ दिग्दर्शित व्हेन द वेव्हज गॉन हा भारताच्या 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीतील गोल्डन पीकॉक पुरस्काराच्या शर्यतीत आहे. बदला आणि हिंसेच्या चक्रावून टाकणाऱया प्रदीर्घ कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल 2022मध्ये प्रीमीयर करण्यात आला. प्रेक्षकांना मी हाताळत नाही फक्त एक निरीक्षक बनू इच्छितो. माझ्या सिनेमात असलेले लोक स्क्रीन आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर नाकारतात. ते सिनेमाचा भाग आहेत असे लव्ह डायझ यांनी सांगितले.
माझ्यासाठी सिनेमा हा एक सांस्कृतिक क्रियाकलाप आणि कलाप्रकार आहे. मला व्यक्त व्हायचे आहे. मला माझ्या संस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करायचे आहे. मला माझ्या सिनेमातून आयुष्य तपासायचे आहे. मला हवा तसा सिनेमा बनवायचा आहे. व्हेन द वेव्हज गॉन हा सात वर्षापूर्वी एक गँगस्टर चित्रपट म्हणून सुरू झाला होता. अभिनेते शोधण्यात आणि बजेटमुळे या चित्रपटाला उशीर झाला. जीवनातील घटना आणि सत्य यांचे कालक्रमण करण्यासाठी सिनेमाला उशीर झाला असला तरी, लव्ह डायझने तरीही बदल घडवून आणण्यासाठी सिनेमाच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला.