मौजेदापोली/ वार्ताहर
दापोली तालुक्यातील कर्दे येथील समुद्रात बुडालेल्या महाबळेश्वर येथील 18 वर्षीय सौरभ धाडवेचा मृतदेह सोमवारी सकाळी 7 वाजता कर्दे समुद्रकिनारी सापडला.
सौरभ सातारा येथील पाच मित्रांसमवेत येथे पर्यटनासाठी आला होता. रात्री खेड येथे त्यांनी एका पेट्रोल पंपावर विश्रांती घेतली व त्यानंतर हर्णै गाठले. तेथे मच्छी खरेदी व जेवण करून हे सहाजण कर्दे समुद्रकिनारी आले. किनाऱयावरच तंबू उभारून आपले साहित्य ठेवले. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास हे सहाजण समुद्रात पोहण्यासाठी गेले. मात्र काही वेळातच ते सर्वजण समुद्रात ओढले जावू लागले. त्यांनी आरडा-ओरडा सुरु केल्याने लगत असलेल्या ओंकार नरवणकर व मकरंद तोडणकर यांनी या पाचजणांना वाचवले. मात्र सौरभ समुद्रामध्ये दिसेनासा झाला होता.
र†िववारपासून दापोलीचे पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर सोमवारी कर्दे समुद्रकिनारी सौरभचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आला. आपण त्याला वाचवू शकलो नाही याची खंत ओंकार नरवणकर व मकरंद तोडणकर यांनी व्यक्त केली.
बोटींग सुरू असते तर सौरभ वाचला असता
समुद्रावर बोटींग सुरू असते तर सौरभला वाचविण्यात यश आले असते. मात्र एवाद्याला तत्काळ वाचविण्यासाठी तेथे साधनसामुग्रीच उपलब्ध नसल्यामुळे सौरभला आपले प्राण गमवावे लागले. याबद्दले नाराजी व्यक्त होत आहे.