जर्मनीतील घटना : नशेत असल्याच्या दाव्याने ‘आप’ची कोंडी
प्रँकफर्ट, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जर्मनीतील प्रँकफर्ट विमानतळावर विमानातून उतरवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना 17 सप्टेंबरची असून मान यांना जर्मनीतील प्रँकफर्ट विमानतळावर लुफ्थान्सा एअरलाईन्सच्या विमानातून उतरवण्यात आले. या विमानातील प्रवाशांनी ते नशेत असल्याचे सांगितले. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी ट्विट करून मान आणि केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. तथापि, आश्चर्याची गोष्ट म्हणजे पंजाब सरकार या घटनेबाबत मौन बाळगून आहे. दुसरीकडे, ‘आप’ने यासंबंधीचे वेगवेगळे दावे फेटाळून लावले आहेत. ‘आप’चे मीडिया कम्युनिकेशन संचालक चंदर सुता डोगरा यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते 17 ऐवजी 18 तारखेला दिल्लीला रवाना झाल्याचे स्पष्टीकरण दिले.
भगवंत मान हे 17 सप्टेंबरला जर्मनीहून दिल्लीला परतत होते. यादरम्यान प्रँकफर्ट विमानतळावर त्यांना लुफ्थान्सा एअरलाईन्सच्या विमानातून खाली उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ते दारूच्या नशेत असल्यामुळे विमान कंपनीने सदर निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. विमानाला 4 तास उशीर झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर विमानातील प्रवाशांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अस्वस्थ करणारी असल्याचे सुखबीर सिंह बादल म्हणाले.
मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे. कारण यात पंजाबी आणि राष्ट्राभिमानाचा समावेश आहे. जर मान यांना विमानातून उतरवले असेल तर भारत सरकारने त्याबाबत जर्मन सरकारशी बोलले पाहिजे, असा मुद्दाही सुखबीर सिंह यांनी उपस्थित केला आहे.
मान 11 सप्टेंबर रोजी जर्मनीला गेले. या दौऱयात त्यांनी जर्मनीमध्ये म्युनिक, प्रँकफर्ट आणि बर्लिनला भेट दिली आणि पंजाबमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. तसेच जागतिक पातळीवरील एका व्यापारी मेळाव्यालाही ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि इतर वरि÷ अधिकारीही होते.