निपाणी तालुक्मयात चार बंधारे पाण्याखाली ः जवाहर तलावाची पाणी पातळीही वाढली
प्रतिनिधी/ निपाणी
गेल्या 8 दिवसांपासून निपाणी शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून पावसाची संततधार कायम असल्याने तसेच धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. परिणामी तालुक्मयातील जत्राट-भिवशी, कारदगा-भोज, भोजवाडी-कुन्नूर, बारवाड-कुन्नूर हे 4 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सदर मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी शनिवारी जत्राट-भिवशी बंधाऱयास भेट देऊन पाहणी केली. तसेच कोडणी येथेही चिकोत्रा नदीची पाहणी केली.
गेल्या 24 तासात निपाणी भागात सुमारे 80 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून 1 जूनपासून आजतागायत एकूण 283 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारपर्यंत काळम्मावाडी धरण 38 टक्के भरले आहे. तसेच 9.74 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच पाटगाव धरण 48 टक्के भरले असून या धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग झालेला नाही. असे असले तरी धरण व पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनदेखील सतर्क झाले आहे.
दरम्यान, निपाणीतील जवाहर तलावाची पाणी पातळी एक फुटाने वाढली असून शनिवारी पाणी पातळी 34 फूट 2 इंच इतकी आहे. तलावाची पाणी पातळी वाढत असतानाही निपाणी शहरात अजून 4 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पालिकेने आता पाणीपुरवठय़ाचे नव्याने नियोजन करण्याची मागणी होत आहे.
विसर्गामुळे पाणीपातळी स्थिर
एकसंबा ः शुक्रवारी पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे पहावयास मिळत होते. शनिवारीही पावसाची स्थिती जैसे थे होती. आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ मंदावल्याचे तालुका प्रशासनाच्या अहवालातून पहावयास मिळत आहे. पण सध्याची नदीकाठची स्थिती पाहता सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असल्याने कृष्णा, वेदगंगा व दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत किंचित वाढच होताना दिसत आहे. कृष्णा नदीची शनिवारची पाणीपातळी 529.11 मीटर होती. तर दूधगंगा नदीची पाणीपातळी 533.240 मीटर इतकी होती. दूधगंगा नदीतून 14 हजार 784 क्मयुसेक तर राजापूर बंधाऱयातून 56 हजार 333 क्मयुसेकने विसर्ग असा एकूण 71 हजार 117 क्मयुसेकने विसर्ग कल्लोळ बंधाऱयानजीक येत आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कृष्णा नदीच्या प्रवाहात किंचित घट झाली आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहता कोयना 76 मि. मी, वारणा 65 मि. मी, काळम्मावाडी 73 मि. मी, नवजा 89 मि. मी, राधानगरी 120 मि. मी, महाबळेश्वर 135 मि. मी, चिकोडी तालुक्मयातील पर्जन्यमापन केंद्रावरील पावसाचे प्रमाण पाहता चिकोडी 13.8 मि. मी, अंकली 10.2 मि. मी , नागरमुन्नोळी 8.8 मि. मी, सदलगा 11.6 मि. मी, जोडट्टी येथे 7.4 मि. मी, निपाणी पीडब्ल्युडी 19 मि. मी, निपाणी एआरएस 10 मि. मी, सौंदलगा 19.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.