घरांच्या किमती 1.85 टक्क्यांनी वाढल्या
पुणे
गेले वर्ष बांधकाम क्षेत्रासाठी चांगले ठरले असून, कोरोनामुळे झालेल्या नुकसानीतून हे क्षेत्र सावरत आहे. 2022 मध्ये घरांच्या किमती 10.85 टक्क्मयांनी वाढल्या आहेत. सरासरी दर डिसेंबर 2021 मध्ये 4,926 प्रति चौ. फूटापासून वाढून डिसेंबर 2022 मध्ये 5,481 प्रति चौ. फूट इतके वाढले आहेत.
गेरा डेव्हलपमेंट्सने त्यांच्या द्वि-वार्षिक अहवालाची जानेवारी 2023 आवृत्ती ‘गेरा पुणे रेसिडेन्शीयल रियल्टी रिपोर्ट’ प्रकाशित केली. याबाबत गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा म्हणाले, हा रिपोर्ट गेरा डेव्हलपमेंट्सने केलेल्या प्राथमिक आणि स्वतःच्या संशोधनावर आधारित असून, यात शहराच्या मध्यभागी असलेल्या 30 किलोमीटरच्या परिघातील सर्व विद्यमान प्रकल्पांचा समावेश आहे. हा अहवाल पुण्याच्या निवासी स्थावर बाजाराच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या, जनगणनेवर आधारित अभ्यासाचा परिणाम आहे. त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे.संपूर्ण शहरामध्ये घरांच्या किमतींमध्ये वाढ झाली असून विशेषतः नवीन प्रकल्पांमध्ये वर्षभरात किंमती 23 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत.