वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतचा खराब फॉर्म पुढे चालू राहिला असून योनेक्स सनराईज इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत त्याला पहिल्याच सामन्यात ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियन डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला.
दुसऱया गेममध्ये श्रीकांतने 14-5 अशी मिळविलेली आघाडी वाया घालवली आणि त्याने हा सामना 14-21, 19-21 असा गमविला. त्यामुळे त्याला प्रोत्साहित करणाऱया समर्थकांची निराशा झाली. या सामन्यात रॅलीजवर वर्चस्व राखत गुण मिळविले. पण नंतर ऍक्सेलसेनने आघाडी घेत पहिला गेम जिंकला. दुसरा गेमही अटीतटीचा झाला. पण अखेर ऍक्सेलसेननेच बाजी मारत दुसरी फेरी गाठली.