फोंडा : फर्मागुडी येथील जीव्हीएम कॉलज सर्कलजवळ अवजड कंटेनर उलटून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. मंगळवारी दुपारी 1 वा. सुमारास हा अपघात झाला. ज्या ठिकाणी हा कंटनेर उलटला तेथे फोंडा पणजी महामार्गावरील वाहतुकीची सतत रहदारी सुऊ असते. सुदैवाने जवळपास एकही वाहन नसल्याने मोठी दुर्घटना टळली. एनएल 01 एएफ 2002 या क्रमांकाचा हा कंटेनर ट्रक पणजीहून ढवळी फर्मागुडी बगलरस्त्याने मडगावकडे जात होता. फर्मागुडी जीव्हीएम सर्कलजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावरच उलटला. कॅबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकाला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाहेर काढले. या सर्कलजवळ वाहन चालकांचा कायम गोंधळ उडत असतो. फोंडा शहर, कदंब बसस्थानक तसेच ढवळी बगलमार्गाने पणजीकडे जाणारी वाहने सर्कलचा वळसा घेतात. पणजीहून फोंडा शहर व मडगाव वास्कोकडे जाणाऱ्या वाहनांनाही सर्कलकडे वळण घ्यावे लागते. त्यामुळे चारही बाजूने येणाऱ्या वाहनांची चुकामुक होत असते. राज्याच्या इतर भागातील व परराज्यातील अनोळखी वाहनांचा अधिकच गोंधळ होत असतो. पणजीमार्गे भरधाव येणाऱ्या वाहनांचा समोर अचानक लागणाऱ्या सर्कलचे वळण घेताना तोल जातो. भरधाव वेगात असलल्या कंटेनरचालकाचा अशाचप्रकारे वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
Previous Articleम्हापशातील व्यापाऱ्यांची आमदारांकडे धाव
Next Article फातोर्डा अपघात: महिलेचा पाय मोडला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment