प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांचा फोन ईन कार्यक्रम शनिवार दि. 8 जुलै रोजी होणार आहे. सकाळी 10 ते 12 यावेळेत जिल्हा पोलीसप्रमुख नागरिकांच्या समस्या ऐकणार आहेत. पोलीसप्रमुखांनी सुरू केलेल्या फोन ईन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केवळ बेळगाव शहर व बेळगाव जिल्हाच नव्हे तर परजिल्ह्यांतील त्रस्त नागरिकही फोनवरून संपर्क साधून आपल्या समस्या मांडत आहेत. गेल्या महिन्यात स्वत: जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला होता.
शनिवारी सकाळी 0831-2405226 या क्रमांकावर 10 ते 12 यावेळेत जिल्हा पोलीसप्रमुख उपलब्ध असणार आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील गैरधंदे, वाहतुकीची समस्या, मटका, जुगार, बेकायदा दारूविक्री व इतर समस्यांविषयी वरील क्रमांकावर संपर्क साधून पोलीसप्रमुखांसमोर गाऱ्हाणे मांडता येणार आहे.