धरणातून ३२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू
नवारस्ता/प्रतिनिधी
कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढू लागली आहे.परिणामी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता कोयना धरणाचे सहा वक्रदरवाजे ४ फुट ६ इंच उघडून २९९०० क्युसेक
विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान धरण पायथा विद्युत गृहामधून सुरू असलेला २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि धरणाच्या सहा वक्र दरवाजा मधून सुरू होणारा २९९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग मिळून कोयना धरणातून कोयना नदीपात्रात एकूण ३२००० क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
त्यामुळे कोयना नदी दुधडी भरून वाहू लागली असल्याने कोयना कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना सिंचन विभागाकडून देण्यात आला आहे.सध्या धरण ९२ टक्के भरले असून धरणात ९७.१८ टीएमसी पाणीसाठा आहे.