सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी तहसीलदार व टीमने यशस्वीरित्या राबवला उपक्रम
शासन आपल्या दारी हा उपक्रम सावंतवाडी तालुक्यात तहसीलदार श्रीधर पाटील आणि त्यांची टीम यशस्वीतेने राबवत आहे. तरी दुर्गम चौकुळ येथील दुर्गम भागात राहणाऱ्या बेरड समाजाच्या लोकांकडे जातीचे दाखले काढण्यासाठी पुरावे उपलब्ध नाहीत. म्हणून स्थानिक नागरिकांची चौकशी करून, दाखले काढण्यासाठी लागणारे प्रतिज्ञा पत्र तिथेच वाडीवर करून देण्यात आले. एक ते सात ऑगस्ट या कालावधी या महसूल सप्ताहामध्ये त्यांना जातीचे दाखले देण्याचे नियोजन आहे. आहे असे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले