आतापर्यंत एकूण 96 इंच पाऊस ,यंदा 32 टक्के अतिरिक्त
विशेष प्रतिनिधी / पणजी
बुधवारच्या तुलनेत काल गुऊवारी पावसाचा जोर कमी झाला, मात्र काळ्dया ढगांनी आभाळ भऊन आले होते. तसेच अधूनमधून पावसाच्या सरी पडून जात होत्या. आगामी 2 दिवसांत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात सरासरी 3.5 इंच पावसाची नोंद सर्वत्र झाली आणि मोसमातील एकूण पाऊस 96 इंच झाला. शतक ठोकण्यास केवळ चार इंच पावसाची गरज आहे. आज वा उद्या पाऊस इंचाचे शतक गाठण्याची शक्यता आहे. यंदाच्या मोसमात किमान 160 इंच पावसाची नोंद गोव्यात होणार आहे.
राज्यात पावसाचा जोर गुऊवारी थोडा कमी झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्माण झालेली पूरसदृश स्थिती दूर झाली आणि पुराचा धोका राहिला नाही. गुऊवारी सकाळी जोरदार पाऊस पडला, मात्र दुपारी पावसाचा वेग मंदावला.
गेल्या 24 तासांत राज्यात 3.5 इंच पावसाची नोंद झाली. सरासरी दररोज साडेतीन ते चार इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद गेले 10 दिवस होत आहे. यंदा आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत 32 टक्के अतिरिक्त पाऊस झालेला आहे. वार्षिक सरासरीपेक्षाही 24 इंच अतिरिक्त पाऊस झालेला आहे.