दिनांक 23-10-2022 ते 29.10.2022
मेष
दुसऱयांची कामे करण्या पेक्षा स्वतःची कामे अगोदर पूर्ण करण्याची गरज आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला काही चांगल्या घटना घडतील. या काळामध्ये स्वतःच्या भावनांवर आणि विशेषतः रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल. काही जुन्या आठवणी आणि घटना यामुळे त्रास होऊ शकतो. नोकरदार वर्गाला कामाची गती वाढवावी लागणार आहे. पैशांच्या बाबतीत निश्चि?त असाल. तब्येतीकडे लक्ष द्यावे.
शनिवारी पिंपळा खालील माती जवळ ठेवावी
वृषभ
ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे याचा अनुभव येईल. या आठवडय़ात तुम्ही दुसऱयांच्या मताला आणि भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. पैशांच्या बाबतीमध्ये चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव येतील. काही निर्णय तुम्हाला मनाविरुद्ध घ्यावे लागतील. पण त्याला पर्याय नसेल. जवळच्या माणसांना मदत करताना भावनिक होऊन चालणार नाही. तब्येतीच्या बाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल.
प्राजक्ताची फुले जवळ ठेवावी
मिथुन
या आठवडय़ामध्ये सबुरीने काम घ्यावे असा संदेश आहे. कोणत्याही बाबतीमध्ये घाई गडबड करून चालणार नाही. विशेषतः कामाच्या ठिकाणी चुका होऊ नयेत असा प्रयत्न करावा. वयस्कर लोकांनी तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल असेल. स्त्री वर्गाला कामाचे ओझे जास्त वाढू शकते. आर्थिक बाबतीत चिंता करावी अशी कोणतीही गोष्ट नाही. प्रेम संबंधांमध्ये गैरसमजामूळे त्रास होऊ शकतो.
मनी प्लांट घरी ठेवावा
कर्क
तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. एखाद्या बातमीचा मनावर परिणाम होऊन थोडा त्रास संभवतो. प्रवास घडण्याची शक्मयता आहे. इतरांबद्दल भावनिक होण्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे जास्त लक्ष देणे योग्य ठरेल. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मनासारखे न घडल्यामुळे थोडे वाईट वाटू शकते. प्रेमींनी एकमेकांना स्पेस देणे आणि समजून घेणे गरजेचे असेल. खर्चाचे प्रमाण वाढेल पण वायफळ खर्च होऊ देऊ नका. पिवळय़ा कागदावर 24 आकडा लिहून जवळ ठेवावा
सिंह
कष्टाचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. प्रत्येक वेळी दुसऱयावर अवलंबून राहता येत नाही असा संदेश आहे. हा आठवडा तुमच्या व्यक्तिमत्वात काही बदल घडवण्यात करता योग्य आहे. कुटुंबातील सदस्यांना समजून घेऊन त्यांच्याशी प्रेमाने वागले तर बरीचशी कामे सोपी होतील. कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये दुसऱयाचे काम तुमच्यावर पडल्याने चिडचिड होईल. आठवडय़ाच्या मध्यात द्विधा मनस्थिती असेल.
मजुरांना दूध दान करावे
कन्या
यशाचे प्रमाण वाढवण्याकरता तुमचे नेटवर्क वाढवण्याची गरज आहे. मित्र परिवारातील लोक प्रत्येक वेळी योग्य सल्ला देतील असे नाही त्यामुळे ऐकावे जनाचे करावे मनाचे असे धोरण ठेवा. तब्येतीत चढ-उतार असेल. डोकेदुखी किंवा त्वचेचे विकार त्रास देऊ शकतात. योग्य वेळी उपचार करून घ्यावा. एखाद्या जवळच्या व्यक्तीला आर्थिक मदत न करू शकल्याने थोडा त्रास होऊ शकतो. या आठवडय़ात पैसे वाचण्याकडे कल असेल.
गरजूला अन्नदान करावे
तूळ
हा आठवडा थोडाफार भावनिक संघर्षाचा असू शकतो. आनंद आणि निराशा दोन्हीही अनुभवाला येऊ शकतात. निर्णय घेण्याच्या क्षमतेची कसोटी असेल. खर्च जास्त होऊ शकतो त्यामानाने पैशाचे येण्याचे प्रमाण कमी असू शकते. जबाबदारी मध्ये वाढ होईल. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. घरगुती कारणामुळे प्रवास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतावर ठाम राहिला तर फायदा होईल.
फणसाची तीन पाने जवळ ठेवावी
वृश्चिक
कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल. ओळखीमुळे नवीन कामे मिळण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ात तुमच्या पराक्रमाला वाव मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी कळेल. पोटाच्या तक्रारीमुळे थोडा त्रास होऊ शकतो. जवळच्या व्यक्तींच्या सहवासामुळे आनंद प्राप्त होईल. प्रेम संबंधांमध्ये वाढ होईल. घरच्या एखाद्या व्यक्तीला मदत करावी लागू शकते.
धार्मिक स्थळी दूध दान करा
धनु
तुमच्या समस्यांचे समाधान फक्त तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला तुमच्या क्षमतांची जाणीव होण्याकरता दुसऱया व्यक्तीची गरज नाही असा संदेश आहे. या आठवडय़ामध्ये काही घटनांमध्ये स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल. काही ठिकाणी कॉम्प्रमाईज करावे लागू शकते. भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक घटना घडतील. तब्येत सर्व साधारण असेल. आर्थिक बाबतीमध्ये सावध राहण्याची गरज आहे.
अशोक वृक्षाचे जमिनीवर न पडलेले पान जवळ ठेवावे
मकर
प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक बाजू चांगली असेल. आसपासच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या बद्दल बातमी कळेल. कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीमुळे चांगले वातावरण बिघडू शकते. या आठवडय़ात कुटुंबीयांकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यांना वेळ देण्याची गरज आहे. प्रवास करत असताना तब्येतीला सांभाळा. दूषित पाण्याचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. वडाची मुळी जवळ ठेवावी
कुंभ
दुसऱयाच्या वागण्या बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका. काही लोक तुमच्या आत्मविश्वासाला तडे कसे जातील त्याचा प्रयत्न करतील. पण या प्रकाराकडे दुर्लक्ष केलेले बरे असा संदेश आहे. परिस्थिती कशीही असली तरी पटकन रिऍक्ट करू नका. निर्णय घेण्यापूर्वी दहादा विचार करावा लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले ठेवण्याकरता प्रयत्न करा. कुटुंबातील काही लोकांना तुमच्या आधाराची गरज असेल. पक्ष्यांना दाणे घालावेत
मीन
आठवडय़ाच्या सुरुवातीलाच कामाचा लोड वाढणार आहे. धावपळ होऊ शकते. आर्थिक बाबतीत काही नवीन घटना घडल्यामुळे परिस्थिती सुधारेल. ऑफिसमधल्या लोकांशी स्मार्ट पद्धतीने वागला तर फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱया वाढल्यामुळे दमछाक होऊ शकते. तुमचे निर्णय घेताना चार चौघांना विचारून घ्यावेत. प्रेम संबंधांमध्ये एखादी गोष्टी खटकल्या मुळे वाद होऊ शकतात. मनातल्या गोष्टी लोकांपुढे बोलताना सावध रहा. विहिरीत एक चमचा दूध ओतावे
टॅरो उपायः घरात क्रिस्टल बॉल अवश्य असावा. पण तो अशा ठिकाणी लावा जिथे प्रकाश त्याच्यावर पडेल. क्रिस्टल बॉल ला टांगण्या करता लाल धागा असावा. विंड चाईम जर असेल तर त्याचा आवाज मंद आणि मंजुळ असावा.