जोडून आलेल्या सुट्टीचा आनंद सातारकरांनी प्रदर्शनात लुटला
प्रतिनिधी/ सातारा
स्मार्ट एक्स्पो ग्रुप च्या व्यवस्थापन अन्तर्गत व मा.श्रीमंत छ. उदयन राजे भोसले मित्र समूह , जय सोशल फौंडेशन चे वतीने छत्रपती कृषी 2022भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी,औद्योगिक, वाहन व पशु पक्षी प्रदर्शन 2022 चे स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित केलेल्या सातारा जिल्हा परिषद मैदानावरील छत्रपती कृषी औद्योगिक वाहन महोत्सव प्रदर्शनाला सातारकरांचा भरभरून आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात आज शनिवारी गर्दीचा विक्रमी उच्चांक ओलांडला शनिवारपासून सलग दोन दिवस जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे सातारा जिह्यातीलच नव्हे तर इतर जिह्यातूनही अनेक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा तसेच नवनवीन माहिती तंत्रज्ञान याचा आनंद घेतला .
छत्रपती महोत्सव या नावाला अतिशय समर्पक अशी केलेली मंडपाची रचना तसेच मंडपाच्या प्रवेशद्वारातच सर्वांचे लक्ष वेधून घेणारी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली आकर्षक मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहे.या प्रदर्शनामध्ये सध्या देशातील दोनशेहून अधिक कंपन्यांच्या वतीने 225 स्टॉलची उभारणी करण्यात आली असून यामध्ये नामवंत कंपन्यांच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाइक्स, कृषी अवजारे, गृहपयोगी साहित्य तसेच महाराष्ट्र राज्य पर्यावरण समितीच्या वतीने बनवलेला शेतकयांसाठी अतिशय उपयोगी असा किसान ड्रोन या स्टॉलमध्ये लक्ष वेधून घेत आहे. शेतकयांच्या बहुउपयोगी अशा घरातील कडबा कुट्टी मशीन तसेच चांगले निरोगी जीवन जगण्यासाठी लागणारी जडीबुटी, संजीवनी ,आयुर्वेदिक औषधे स्टॉल गर्दी खेचत आहेत.
शेतकयांना लागणारी खते ,बी- बियाणे आणि त्याचा वापर करण्यासाठी उपयोगात येणारी अत्याधुनिक यंत्र, अवजारे या स्टॉलवर पाहायला मिळत आहेत. गृह उपयोगी साहित्यात अनंत ट्रेडिंग कार्पोरेशनचे आटा चक्की चे स्टॉल लक्षवेधक आहेत .पिकांच्या भरगोस वाढीसाठी लागणारी विविध औषधे तसेच प्रेरके या ठिकाणी कंपन्या द्वारे उपलब्ध आहेत. हिंदुस्तान हायटेक नर्सरी ने बनवलेली नवीन जातीची विविध प्रकारची रोपे येथे पाहायला मिळत आहेत .सह्याद्री एरोस्पेस कंपनीचा शेतकयांच्यासाठी मदतीचा मित्र ठरणारा खत फवारणी ड्रोन हा सुद्धा विशेष गर्दी खेचत आहे .
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड च्या वतीने उज्वला युरिया, सुफला याबाबतची माहिती देणारी माहिती पत्रकांचा स्टॉल तसेच महाबळेश्वर येथील संस्थेचे विविध प्रकारचे मध येथे पाहायला मिळत आहेत .सौंदर्यप्रसाधने, फेस पावडर, फेस मास्क, फेस लोशन ,तळपायाच्या भेगा घालवण्याचे क्रीम ,शाम्पू ,ब्युटी मास्क असे सौंदर्य प्रसाधनाचे स्टॉल हे लक्ष वेधत आहेत .
खवय्यांसाठी कुणाल भाऊंचा घरगुती मंचूरियन मसाला तसेच मटन बिर्याणी ,चिकन बिर्याणी ,तवा मटन, तवा पुलाव, टेस्टी वडापाव ,खमंग चटकदार मिसळ स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत आणि या ठिकाणी खवय्यांची प्रचंड गर्दी होत आहे विविध फळांच्या कटिंग साठी लागणारे ज्यूसर, घरगुती वापराचे वजन काटे तसेच त्यांची विक्री व दुरुस्ती लोणची, मसाले याचबरोबर शेतकरी तसेच उत्पादक शेतकयांसाठी कडबा कुट्टी चे मशीन घरगुती पिठाच्या चक्क्या या सोबतच ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे ट्रक्टर, बिर्ला ऍग्रो मशीनरी यांचे म्हसवडकर मिनी हार्वेस्टर, चेंज वॉटर, पंप ब्रश कटर, रिपर अर्थ ब्रश कटर, इंटर कल्टीवेटर मशीनरी साहित्य या ठिकाणी शेतकरी व कृषी उत्पादकांसाठी लक्ष वेधून घेत आहेत .
ठिबक सिंचन तसेच या प्रणालीसाठी लागणाया छोटय़ा मोठय़ा साहित्यांचे केंद्र ही या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने गुणवत्तापूर्ण चांगल्या योजनांची माहिती देणारी माहिती पुस्तिका आणि स्टॉल येथे पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शन ख्रया अर्थाने भेट देऊन गौरविले आहे. हे प्रदर्शन येत्या 11 ऑक्टोबर पर्यंत सर्व सातारा जिल्हा वाशियासाठी सुरू राहणार असून या प्रदर्शनात प्रदर्शन सोबतच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज होणाया देशी-विदेशी डॉग शोचे आयोजन महोत्सव प्रांगणात करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे सहसंयोजक सातारा येथील जय सोशल फाउंडेशनचे प्रमुख युवा उद्योजक सागर भोसले यांनी या प्रदर्शनाविषयी माहिती देताना यावेळी सांगितले की ,ख्रया अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाया सर्वांच्या लाडक्या खासदार उदयनराजे भोसले यांचा राजाश्रय आणि भरभक्कम पाठिंबा या प्रदर्शनासाठी लाभत असतानाच सातारकरांनी दिलेला उदंड प्रतिसादच हा राजाश्रया बरोबरच लोकाश्रयाचा मोठा पाठिंबा येथे आम्हाला मिळत आहे.राजे साहेबांनी व्यक्त केलेले शेतकयांचे हित, त्यांचे साठी चे काम आमचे बळ वाढविणारे आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी अपेक्षित केलेला हा महोत्सव ख्रया अर्थाने देश पातळीवर एक सातारा पॅटर्न म्हणून यापुढे नावाजला जाईल असे वाटते आणि यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य आणि भरभक्कम पाठिंबाच अपेक्षित आहे तो यापुढेही आपण निश्चित द्याल असा विश्वास वाटतो.
या प्रदर्शनासाठी 11 ऑक्टोबर पर्यंत सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट देऊन आनंद लुटावा असे आवाहन संयोजक स्मार्ट एक्सपो ,सांगलीचे सोमनाथ शेटे व सौ. रेखा शेटे यांनी केले आहे