वन रक्षकांकडून जीवनदान
प्रतिनिधी / मडगाव
गोयचे भाट-वेळ्ळी येथे एका विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला वन रक्षकांनी सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले. वेळळी भागात बिबटय़ा पोचल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. बिबटय़ामुळे या भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मडगाव वन खात्याला बिबटय़ा विहिरीत पडल्याची कल्पना देण्यात आली. वन विभागाचे रेस्क्मयू अधिकारी ज्युलिओ कार्दोज आणि बेंन्हाल आंताव तसेच मडगावचे आरएफओ प्रकाश नाईक, फोरेस्ट गार्ड समर्थ नाईक, गुरूप्रसाद विर्डीकर, सज्जन नाईक, नवजीवन नाईक, सज्जन जुवेकर, जानू, ड्रायव्हर ज्योकीम फर्नांडिस, सत्यवान मळेकर, भगवान रेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वन रक्षकांनी विहिरीत दोरीने पिंजरा सोडला आणि मोठय़ा प्रयत्नांची शिकस्त करीत विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला त्या पिंजऱयात बंदीस्त केले व त्याला सुखरूप बाहेर काढले. रात्री 10 वाजता सुरू झालेले हे रेस्क्यू ऑपरेशन पहाटे 3 वाजे पर्यंत चालू होते. हा नर बिबटा मध्यम वयाचा होता. आणि पाण्यातून बाहेर येण्यास धडपडत होता. या बिबटय़ाला नंतर जंगलात सोडून देण्यात आले.
वेळळी सारख्या भागात बिंबटय़ा पोचल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच बरोबर घबराटीचे वातावरण पसरले आहे.