आमदार मायकल लोबो यांची माहिती : पर्रा येथे स्व. मनोहर पर्रीकर जयंती साजरी : परीकरांना जगभरातील लोक ओळखतात
प्रतिनिधी / म्हापसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात जे काही बोलले ते सर्वांनी परत एकदा ऐकावे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, देशाबरोबरच राज्यासाठी मनोहर पर्रीकर यांनी जे कार्य केले त्याचे हे बक्षीस म्हणजे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ राज्याला दिले आहे आणि स्व. मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ मोपा विमानतळाला ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ म्हणून नाव देत आहोत. त्यामुळे ‘पर्रीकर’ न घातल्यास काही फरक पडत नाही. भारतातीलच नव्हे तर जगातील नागरिक स्व. मनोहर पर्रीकरांना ओळखतात. त्यामुळे या वायफळ चर्चेला इथेच पूर्णविराम घालणे काळाची गरज आहे, असे स्पष्टीकरण कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी पर्रा येथे प्रसार माध्यमाशी बोलताना दिले.
स्व. मनोहर पर्रीकर यांच्या पर्रा येथे जयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार लोबो बोलत होते. पंतप्रधान मोदी यांचे पर्रीकर हे जवळचे मित्र होते. मोदी गुजरात तर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधानांनी श्रद्धांजलीपर पर्रीकर यांची आठवण व प्रेम दाखविले म्हणून आम्ही सर्व गोमंतकीयांबरोबरच पर्रीकरांच्या मूळ गावचे पर्रावासिय पंतप्रधानांचे आभार मानत असल्याचे आमदार लोबो म्हणाले.
डान्स बार, दलाल आदींवर पंचायतीने लेखी कारवाई करावी
कळंगूटमधील बेकायदेशीर डान्सबार, दलाल यांच्यावर कायमस्वऊपी बंदी आणायची असेल तर लेखी स्वऊपात कारवाई आवश्यक आहे. या अगोदर आम्ही त्यांच्यावर कारवाई करायला गेलो असता त्यांनी आम्हाला न्यायालयात खेचले होते व पोलीस स्थानकात तक्रारही केली होती. कारण त्यांना पंचायतीची परवानगी होती. आता मुख्यमंत्री, आपण व सर्व मंत्रिमंडळ पंचायतीसोबत असून सरपंचांनी पुढाकार घेऊन कारवाई करावी. मामलेदार, जिल्हाधिकारी यांचीही हवी तरी मदत घ्यावी पण बेकायदेशीर कृत्ये करणारे सर्व धंदे कायमस्वऊपी बंद होणे आवश्यक आहे, असे मायकल लोबो म्हणाले.
राज्याच्या इतिहासात पंतप्रधान मोदीजी प्रथमच आमदारांशी थेट संपर्क साधून प्रत्येकाची मते जाणून घेतली
पंतप्रधानांनी मोपा विमानतळ उद्घाटनानंतर उपस्थित सर्व आमदारांशी चर्चा केली. ज्याप्रमाणे त्यांनी गुजरातच्या नागरिकांशी जवळीक साधून गेली 27 वर्षे सत्ता केली, तेथे भाजपचा आराखडा वरच जाताना दिसत आहे त्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या मतदारसंघातील नागरिकांच्या जवळ जा, त्यांच्या समस्या सोडवा असे सांगितले. इतिहासात प्रथमच पंतप्रधानांनी आमदारांशी समोरा समोर थेट संवाद साधला. सर्वांना ते ओळखतात, प्रत्येकाच्या मदरासंघाची माहिती व मतदारांसाठी काय करीत आहात याची माहिती जाणून घेतले, असे आमदार लोबो यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीबाबत काही बोलले नसले तरी नागरिकांशी जवळीक साधा, असा कानमंत्र पंतप्रधानांनी दिल्याचा यावेळी सांगण्यात आले.
कळंगूटमध्ये पार्किंग सोय आवश्यक
कळंगूट सध्या रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यापूर्वी आम्ही विविध पार्किंग लॉट नमूद केले होते ते पुन्हा करणे आवश्यक आहे अशी माहिती आमदार लोबो यांनी पार्किंग समस्येबाबत बोलताना दिली. निविदा काढून येत्या 4 महिन्यासाठी ते चालविण्यास कुणाला तरी द्यायला पाहिजे अन्यथा यापेक्षाही अधिक पार्किंग समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. येणारा काळ हा पर्यटन मौसम असून देशीबरोबर विदेशी पर्यटकही येथे मोठ्या प्रमाणात येणार असल्याचे आमदार लोबो म्हणाले.