वृत्तसंस्था / पुणे
बालेवाडीच्या क्रीडा संकुलात झालेल्या चौथ्या टेनिस प्रेमियर लिग सांघिक स्पर्धेत हैदराबाद स्ट्रायकर्सने सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन्ही सामने अटीतटीचे झाले.
हैदराबाद स्ट्रायकर्स आणि चेन्नई स्टॅलियन्स यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळवला गेला. हैदराबादच्या कॉनी पेरीनने चेन्नई स्टॅलियन्सच्या केझीओनोव्हाला 10-10 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर पुऊष एकेरीच्या सामन्यात हैदराबाद स्ट्रायकर्सच्या निकी पोनाच्याने चेन्नई स्टॅलियन्सच्या मथायस बोर्गीचा 13-7 असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या सामन्यात हैदराबाद स्ट्रायकर्सच्या श्रीराम बालाजी आणि पेरीन यांनी चेन्नई स्टॅलियन्सच्या केझीओनोव्हा आणि अनिऊद्ध चंद्रशेखर यांचा 13-7 असा पराभव केला. त्यानंतर हैदराबाद स्ट्रायकर्सने चेन्नई स्टॅलियन्सचा 48-32 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
मुंबई लेऑन आर्मी व बेंगळूर स्पार्टन्स यांच्या दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळवला गेला. बेंगळूरच्या करमन कौर थंडीने महिला एकेरीच्या सामन्यात मुंबई लेऑनच्या आकांक्षा निटुरेचा 13-7 असा पराभव केला. पुऊष एकेरीच्या सामन्यात मुंबई लेऑनच्या रामकुमार रामनाथनने बेंगळूर स्पार्टन्सच्या सिद्धार्थ रावतचा 11-9 असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या सामन्यात मुंबई लेऑनने बेंगळूर स्पार्टन्सचा 12-8 असा पराभव केला. मुंबई लेऑन आर्मीच्या सिद्धार्थ रावतने मुंबई पुऊष एकेरीच्या सामन्यात बेंगळूर स्पार्टन्स विष्णूवर्धनचा 11-9 असा पराभव केला. या संयुक्त कामगिरीच्या जोरावर मुंबई स्पार्टन्स संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना बेंगळूर स्पार्टन्सचा 41-39 असा पराभव केला.
हैदराबाद स्ट्रायकर्स आणि मुंबई लेऑन आर्मी यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीतील पुऊष एकेरीच्या सामन्यात मुंबई लेऑन आर्मीच्या रामकुमार रामनाथने हैदराबाद स्ट्रायकर्सच्या निक्की पुनाचाच 12-8 असा पराभव केला. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या सामन्यात मुंबई लेऑनच्या एन. जीवन व आकांक्षा निटुरी यांनी श्रीराम बालाजी आणि कॉनी पेरीन यांचा 13-7 असा फडशा पाडला.
त्यानंतर पुऊष दुहेरीच्या सामन्यात हेद्राबाद स्ट्रायकर्सच्या श्रीराम बालाजी आणि निकी पुनाचा यांनी मुंबईच्या एन. जीवन आणि रामनाथन यांचा 14-6 असा पराभव केला. अखेर हैद्राबाद स्ट्रायकर्सने ही अंतिम लढत 41-32 अशी जिंकून टेनिस प्रेमियर लिगचे दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले.