फ्लिपकार्ट सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांचे संकेत ः कंपन्यांनी टिकून राहण्यावर भर द्यावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय स्टार्टअपना आगामी काळ कठीण जाणार आहे. कारण येत्या 12 ते 18 महिन्याचा अवधी भारतीय स्टार्टअप्सना अस्थिरतेचा काळ असणार आहे, फ्लिपकार्ट ग्रुपचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. ते एका स्टार्टअप अवॉर्ड्स 2022 कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले, की पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून निधी कपातीमुळे नवीन-युगातील तंत्रज्ञान कंपन्यांवर परिणाम होईल. यानंतर गोष्टीत सुधारणा होतील आणि कंपन्यांनी या काळात टिकून राहण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कृष्णमूर्ती म्हणाले, ‘पुढचे वर्ष कठीण जाणार आहे. मला वाटते की पुढच्या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान, बरेच लोक निधी मिळविण्यासाठी बाजारात येतील.’
गेल्या वर्षी कंपन्यांनी भरपूर पैसा कमावला
कृष्णमूर्ती म्हणाले, ‘वर्ष 2021 मध्ये कंपन्यांच्या मूल्यांकनात दुप्पट ते सहा पटीने वाढ झाली आहे. ही वाढ पुढील 2 ते 3 वर्षांसाठी केलेल्या काही गृहितकांमुळे होती. गेल्या वर्षी कंपन्यांनी भरपूर पैसा कमावला. या मुल्यांकनानुसार त्यांची वाढ होणे आवश्यक आहे.’
फ्लिपकार्टने अनेक अधिग्रहणे बंद केली
फ्लिपकार्टने गेल्या दोन वर्षांत अनेक अधिग्रहणे बंद केली आहेत. यामध्ये ट्रव्हल बुकिंग पोर्टल क्लियरट्रिप, ऑनलाइन फार्मसी शास्तसुंदर मार्केटप्लेस आणि डायरेक्ट-टू-कंझ्युमर, सॉफ्टवेअर-एज-ए-सर्व्हिस (सास) प्लॅटफॉम ऍण्ड एएनएस कॉमर्सचा समावेश आहे.
फ्लिपकार्टचा आयपीओ येणार नाही
फ्लिपकार्ट गेल्या वर्षी आयपीओ मार्केटमध्ये प्रवेश करू पाहत होती. पण सध्या फ्लिपकार्टने हा विचार बदलला आहे. कृष्णमूर्ती म्हणाले की, एखादी कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर तिने आयपीओ सादर करावा, हे मला पूर्णपणे मान्य नाही. फ्लिपकार्ट आयपीओ घेऊन येत आहे याबद्दल वाद घातला नाही.