आदित्य रॉय कपूरने शेअर केले पोस्टर
फेब्रुवारीत डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या ‘द नाइट मॅनेजर’ या सीरिजला मोठी पसंती मिळाली होती. या वेबसीरिजचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुक केले होते. पहिल्या सीझननंतर आता प्रेक्षक याच्या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता सीरिजमधील अभिनेता आदित्य रॉय कपूरने द नाइट मॅनेजर 2 कधी प्रदर्शित होणार याचा खुलासा केला आहे.
आदित्यने इन्स्टाग्रामवर वेबसीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘आता सुरू होणार तुमच्या पहारेदाराची कहाणी, पार्ट 2 डिस्ने प्लस हॉटस्टारवर 30 जून रोजी प्रदर्शित होणार’ असे त्याने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
फेब्रुवारीत प्रदर्शित ‘द नाइट मॅनेजर’मधूनच आदित्यने ओटीटीवर पदार्पण केले आहे. यामुळे त्याच्याकरता ही सीरिज अत्यंत खास आहे. 2016 मध्ये ब्रिटनमध्ये प्रदर्शित ‘द नाइट मॅनेजर’चा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. भारतीय सीरिजचे दिग्दर्शन संदीप मोदी यांनी केले आहे. या वेबसीरिजमध्ये आदित्यसोबत अनिल कपूर, शोभिता धुलिपाला आणि तिलोत्तमा शोम हे दिग्गज कलाकार दिसून आले आहेत.