कंट्री ऑफ मिडनाइट सन अशी देशाची ओळख
हवामान अधिक बदल न झाल्यास दरदिनी पृथ्वीवर सूर्याचा पहिला आणि अखेरचा किरण जवळपास निश्चित वेळेत पोहोचत असतो, परंतु पृथ्वीवर सूर्य वेगवेगळय़ा वेळेत उगवत असतो. भारत आणि अमेरिकेच्या प्रमाणवेळेत मोठे अंतर आहे. अमेरिकेच्या वेगवेगळय़ा हिस्स्यांमध्येच प्रमाणवेळेत मोठा फरक आहे. पृथ्वीवर काही देशात दिवस मोठा असतो, तर काही ठिकाणी रात्र संपण्याचे नावच घेत नाही. युरोप खंडातील एका देशात रात्र केवळ 40 मिनिटांची असते, मध्यरात्री सूर्यास्त होतो आणि काही वेळातच पुन्हा पहाट होते.
नॉर्वेमध्ये रात्री 12.43 वाजण्याच्या सुमारास सूर्यास्त होतो, याच्या 40 मिनिटांनी म्हणजेच 1.30 वाजता पुन्हा पहाट होऊ लागते. परंतु हा प्रकार पूर्ण वर्षभर चालत नाही, सूर्यास्ताचा आणि 40 मिनिटांनी सूर्योदय होण्याचा हा क्रम अडीच महिने चालतो. याचमुळे नॉर्वेला ‘कंट्री ऑफ मिडनाइट सन’ देखील म्हटले जाते. युरोपीय देश नॉर्वे आर्क्टिक सर्कलमध्ये मोडतो. नॉर्वेमध्ये मे ते जुलैदरम्यान 76 दिवसांमध्ये सूर्यास्तच होत नाही.
नॉर्वे हा देश युरोपच्या उत्तर टोकाला आहे. उत्तर धूव अत्यंत नजीक असल्याने तेथे थंडीचे प्रमाण अधिक आहे. याचमुळे नॉर्वे हा हिमाच्छादित पर्वतांनी वेढलेला देश आहे. या देशात ग्लेशियर्सचे प्रमाण अधिक आहे. नॉर्वेमधील रोरोस शहराला सर्वात थंड क्षेत्र मानले जाते. या क्षेत्राचे तापमान उणे 50 अंश राहते. निसर्ग आणि निसर्गाशी निगडित अद्भूत घटना अनुभवण्याची आवड असणाऱयांसाठी हा देश सर्वात उत्तम ठिकाण आहे.