आमदार व्हिएगसकडून वाहतूकमंत्र्यांना धन्यवाद
मडगाव : टॅक्सी खरेदीवरील प्रलंबित सब्सिडी देण्यात यावी यासाठी बाणावलीचे आमदार पॅप्टन व्हेन्झी व्हिएगस यांनी मांडलेल्या खासगी सदस्य ठरावावर सदर मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले. या टॅक्सीमालकांच्या समर्थनार्थ उचललेल्या सकारात्मक पावलाबद्दल आमदार व्हिएगस आणि स्थानिक पर्यटक टॅक्सीमालकांनी मंत्री गुदिन्हो यांचे आभार मानले आहेत. गुदिन्हो यांनी पर्यटक टॅक्सीचालकांचा बॅज कायम राहील असेही सांगितले आहे, याकडे आमदार व्हिएगस यांनी यावेळी लक्ष वेधले.