प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या खूनातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आहेत़ वारीशे यांचा खून हा पूर्वनियोजित व प्लॅन करून करण्यात आल्याची माहिती समोर येत आह़े त्यानुसार घटनेच्या दिवशी पंढरीनाथ हा कुणाकुणाच्या संपर्कात होता, या बाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े पंढरीनाथ वापरत असलेल्या मोबाईल सीमकार्ड कंपनीकडे कॉल डिटेल्स उपलब्ध करून देण्याची मागणी पोलिसांनी केली आह़े
पत्रकार शशिकांत वारीशे यांचा मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली येथे 6 फेबुवारी 2023 रोजी थार गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होत़ा सुरूवातीला अपघात असल्याचे वाटणाऱया या घटनेमागे काहीतरी संशयास्पद असल्याचे दिसून येत होत़े पोलीस तपासात पंढरीनाथ आंबेरकर याने सुनियोजित पद्धतीने शशिकांत यांचा खून केल्याचे समोर आल़े पंढरीनाथ यानेही खुनाची कबुली पोलिसांजवळ दिली आह़े या प्रकरणी अखेर पोलिसांकडून पंढरीनाथ याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शशिकांत वारीशे यांच्या खुनामागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. वारीशे हे आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून रिफायनरी विरोधाची भूमिका मांडत होत़े त्याचप्रमाणे जमिनींच्या गैरव्यवहाराबाबत वारीशे हे सातत्याने भूमिका मांडत होत़े रिफायनरीविरोधात भूमिका घेत असल्याने शशिकांत हे अनेकांच्या मनामध्ये सलत होत़े यातूनच शशिकांत यांचा काटा काढला असावा, अशी शंका उपस्थित करण्यात येत आह़े पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर यापूर्वीही पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होत़े तसेच राजापूर न्यायालय परिसरातही रिफायनरी समर्थकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील पंढरीनाथवर ठेवण्यात आला होत़ा यामुळे शशिकांत वारीशे यांच्या खूनामागे मोठे षडयंत्र असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यासाठी पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आह़े पंढरीनाथ याच्या कॉल डिटेल्समधून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
पेट्रोल पंपावरील सीसीटिव्ही डीव्हीआर जप्त
शशिकांत वारिशे हे कोदवली येथील पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरून बाहेर पडल्यानंतर त्यांचा घातपात झाला होत़ा पोलीस तपासात पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही पॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आह़े सीसीटीव्ही पॅमेऱयाचे चित्रण डिव्हीआरमध्ये रेकॉर्ड होत असत़े पेट्रोल पंपावरील हे सीसीटीव्ही पॅमेरे नेमके कोणत्या कारणामुळे बंद होते, केव्हा बंद होते, त्याची दुरूस्ती का करण्यात आली नाही, जाणीवपूर्वक सीसीटीव्ही पॅमेरे बंद ठेवण्यात आले, या संबंधी तपास करण्यासाठी कोदवली पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आह़े