महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता, साहिल मोरे आत्महत्या प्रकरण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरानजीकच्या ज़े के. फाईल्स साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर मृतदेह आढळून आलेल्या साहिले मोरे याच्या आत्महत्येचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आह़े यासाठी पोलिसांनी साहिलसह त्याच्या मैत्रिणीचे कॉल डिटेल्स मोबाईल कंपनीकडून मागवले आहेत़ दोघांचेही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आह़े यातून काही महत्वाची माहिती समोर येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आह़े
साहिल विनायक मोरे (22, ऱा अलावा रत्नागिरी) या तरूणाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी शहरालगतच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर आत्महत्या केली होत़ी यावेळी साहिल याच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साहिल याने गळफास घेताना तो रूममध्ये एकटाच होत़ा तर मैत्रिण ही इमारतीखाली त्याची वाट पाहत होत़ी दरम्यान बराच वेळ निघून गेल्यानंतर तिने साहिल याच्या मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केल़ा मात्र साहिल याने तिच्या कॉलला उत्तर दिले नाह़ी अखेर साहिल याचा शोध घेण्यासाठी मैत्रिण पुन्हा फ्लॅटवर गेल़ी यावेळी साहिल हा किचनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल़ा
साहिल याने गळफास घेतलेला पाहून मैत्रिणीने साहिल याच्या बहिणीला फोन पेल़ा तसेच आपल्या मित्रालाही तिने कॉल केल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान घटनेच्या दिवशी साहिल याच्या मैत्रिणीने कॉल केल्याबाबतची सत्यता पोलिसांकडून आता तपासण्यात येत आह़े तसेच मैत्रिणीने घटनेच्या अगोदर व नंतर कुणाला फोन कॉल केले होते, या संबंधी मागील 6 महिन्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आहेत़ त्यातून या घटनेविषयी माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े
घटनेच्या दिवशी पोलिसांनी साहिल याच्या मैत्रिणीच्या फ्लॅटची पूर्ण तपासणी केल़ी घटनास्थळावरून पोलिसांना साहिल याचा मोबाईल हाती लागला आह़े या मोबाईलमधून काही माहिती मिळते का, या बाबत पोलिसांचा तपास सुरू आह़े साहिल कुणाच्या संपर्कात होता, या बाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आह़े यासाठी साहिलच्याही मोबाईलचे कॉल डिटेल्स मागवण्यात येत आहेत़ दोन्ही मोबाईलचे कॉल डिटेल्स पोलिसांकडून जुळवून पाहिले जाणार आहेत़
साहिल याने गळफास घेतल्यानंतर सुरूवातीपासूनच त्याच्या कुटुंबियांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आल़ा घरातून निघताना साहिल आनंदी होता. त्याच्या चेहऱयावर कोणत्याही प्रकारचा ताणतणाव दिसत नव्हता, असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. साहिलच्या मृत्यू प्रकरणाचा कसून तपास करण्यात यावा, अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात आली आह़े त्यानुसार पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे सांगण्यात आले.