पंतप्रधान मोदींच्या सूचनेचा परिणाम ः सीआयए प्रमुखांचे मत
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशिया-युक्रेन युद्धात अण्वस्त्रांच्या वापराबद्दल व्यक्त झालेल्या चिंतेचा परिणाम झाल्याचे विधान अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख विलियम बर्न्स यांनी केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी युद्धात अण्वस्त्रांच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली होती. याचा रशियावर प्रभाव पडला आहे. रशिया आता युद्धात अण्वस्त्रांचा वापर करेल असे आम्हाला वाटत नसल्याचे बर्न्स यांनी म्हटले आहे.
रशियासमोर सद्यघडीला अण्वस्त्र हल्ला करण्याची कुठलीही योजना असल्याचे मला वाटत नाही. रशिया केवळ अण्वस्त्रांच्या वापराची धमकी देत आहे. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांनी युद्धावरून चिंता व्यक्त केली असून याचा प्रभाव दिसून येत असल्याचे बर्न्स यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
रशिया एका रणनीति अंतर्गत हल्ले करत असल्याचे पुतीन यांचे म्हणणे आहे. रशिया स्वतःच्या सुरक्षेसाठी अण्वस्त्रs वापरू शकतो. अमेरिकेची अण्वस्त्रs युरोपमध्ये आहेत, परंतु रशियाची अण्वस्त्रs कुठल्याच अन्य देशामध्ये नाहीत. अण्वस्त्रs तैनात करण्याची आम्ही योजना नाही, परंतु आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतो असे पुतीन म्हणत असल्याचे बर्न्स यांनी नमूद पेले आहे.