मालवण प्रतिनिधी
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून लिशा जयवंत सावंत या विध्यार्थीनीने ४६१ गुण मिळवीत प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण मधून ६० विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातील १७ विध्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली तर ३० विध्यार्थी प्रथम श्रेणी १२ विध्यार्थी द्वितीय श्रेणी आणि १ विध्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.या प्रशालेतून श्रीकांत महादेव घोडके हा ४५८ गुण मिळवून द्वितीय आला असून नतालिया अंतोन लुद्रीक या विध्यार्थीनीने ४४५ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावीला या प्रशालेमधून सानिका गुरूदास मालंडकर हिने ४४२ गुण मिळवीत चतुर्थ क्रमांक पटकावला. साहिल महादेव कोयंडे, भगवान रमेश पाटकर या दोन विध्यार्थ्यांनी प्रत्येकी ४३६ गुण मिळवीत पाचवा क्रमांक पटकावला.
यशस्वी विध्यार्थ्यांचे हायस्कूलचे मुख्याध्यापक एच बी तिवले माजी मुख्याध्यापक वामन खोत, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर तसेच संस्था पदाधिकारी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.