कंत्राटदाराचे दुर्लक्ष : तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
होनगा ते हेग्गेरी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, काही दिवसातच एका ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला असून त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्मयता आहे. तेव्हा कंत्राटदाराने तातडीने भराव टाकून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी अनेक वेळा अधिकारी, कंत्राटदार यांना कळविण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या पावसामुळे आता गंभीर समस्या निर्माण झाली असून तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
राष्ट्राrय महामार्गापासून काही अंतरावरच हेग्गेरी गाव आहे. या गावाला जाण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध आहे. मात्र, त्या रस्त्याला भगदाड पडल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात घडण्याची शक्मयता आहे. आता पावसामुळे आणखी रस्ता खचण्याची शक्मयता व्यक्त होत असून तातडीने त्याची दुरुस्ती करून पुन्हा डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
सध्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे कठीण होत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करत असताना अद्याप तरी कोणीच हा रस्ता करण्यासाठी पुढे आलेले नाही. तातडीने रस्ता करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.